Home अकोले अकोले तालुक्यातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, कारण अज्ञात

अकोले तालुक्यातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, कारण अज्ञात

अकोले: अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

या मुलाच्या घशातील स्त्राव सोमवारी घेण्यात आले असून पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. २८ मार्चला तो ठाणे जिल्ह्यातून अकोले तालुक्यात गावी आला. तो ठाणे जिल्ह्यात शाळेला होता. या मुलामध्ये कावीळची लक्षणे होती असे डॉक्टरचे म्हणणे आहे. पुणे येथील अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अकोले तालुक्यामध्ये अजून एकही करोना रुग्ण आढळून आलेला नाही. अकोले तालुक्यातील प्रशासनाकडून  दक्षता घेण्यात आली आहे. या मुलाच्या अज्ञात कारणाच्या मृत्यूमुळे तालुक्यात चिंता व्यक्त होत आहे. अकोले तालुक्यातील नागरिक पुणे येथील अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत.

Website Title: Latest News 15 yrs boy dies in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here