Home अहमदनगर नगरमधील ४ हॉटस्पॉट ठिकाणी संपूर्ण संचारबंदीत वाढ करण्यात आली

नगरमधील ४ हॉटस्पॉट ठिकाणी संपूर्ण संचारबंदीत वाढ करण्यात आली

अहमदनगरमधील करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी दक्षतेची उपाययोजना म्हणून नगर शहरातील मुकुंदनगर,आलमगीर, जामखेड आणि संगमनेर हे क्षेत्र हॉटस्पॉट म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रातील दोन किलोमीटरचा परिसर कोअर एरिया म्हणून जाहीर केला आहे. या क्षेत्रातील सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा , वस्तूंची विक्री काल १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यात आली होती. या आदेशात आता गुरुवार दिनांक २३ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली असून याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केली आहे. या परिसरातील नागारीकाना घराबाहेर पाउल टाकण्यास व इतरांना या परिसरात भटकण्याची सक्त मनाई केली आहे. हि चारही ठिकाणे सीलबंद करण्यात आली आहे.

राहुल द्विवेदी यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, लॉकडाऊनचे लोकांनी गांभीर्य लक्षात घेऊन आदेशाचे पालन करावे, आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईस सामोरे जावे लागेल.

करोनाची स्थिती: ११८० व्यक्तींची तपासणी, २८ करोना बाधित, १०८८ निगेटिव्ह, ८४ देखरेखित, ४५५ विलगीकरण कक्ष, ३ रुग्ण डिस्चार्ज, ५८ अहवाल बाकी.

Website Title: Latest News Ahmednagar hotspot increase days 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here