Home अकोले अकोले: तीर्थाचीवाडी शाळेत साकारली सुंदर परसबाग.

अकोले: तीर्थाचीवाडी शाळेत साकारली सुंदर परसबाग.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार दयावा तशी मुर्त घडते. म्हणूनच विदयार्थ्याना चार भिंतीच्या आतिल शिक्षणाबरोबरच चार भिंतीच्या बाहेरीलही शिक्षण तितकेच महत्वाचे आहे. हाच विचार मनाशी बाळगुन अकोले तालुक्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खिरविरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तीर्थाचीवाडी येथील मुख्याध्यापक दिगंबर वाकळे यांच्या संकल्पनेतुन सुंदर परसबाग साकारली.या वर्षी पाऊस थोडा उशिरा सुरू झाल्यामुळे प्रकल्प क्षेत्रात अजून रानकाकड्या परिपक्व    झालेल्या नाहीत.शाळेच्या परिसरातच किचन गार्डन संकल्पनेतून युवा आयडॉल पुरस्कार विजेते मुख्याध्यापक दिगंबर वाकळे तसेच भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम आंतरराष्ट्रीय पुरस्फार प्राप्त शिक्षक नरेंद्र राठोड यांनी जून मध्ये काकड्यांची लागवड केली होती. वेळोवेळी पाणी देऊन तसेच देखभाल करून त्यांची जोपासना केली होती. त्यामुळे आजही शाळेच्या चौफेर परसबाग फुललेली आहे.
यामुळे जेव्हा मुलांचे मध्यान्ह भोजन सुरू होते तेव्हा मुलांच्या ताटाजवळ ताज्या रसरशीत रानकाकडी दिसुन येते.विशेष म्हणजे सर्व मुलांना परसबागेत लावलेल्या झाडांची ओळख माहीत असल्याची दिसून आली.मुख्याध्यापक दिगंबर वाकळे आणि नरेंद्र राठोड  यांच्या प्रयत्नातून हे शक्य झालेले आहे. त्यामुळे यशस्वीरीत्या परसबाग प्रकल्प राबवला आहे. या कौतुकास्पद उपक्रमामुळे बायफ या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे विभागीय अधिकारी जितीन साठे, सिनिअर प्रोग्राम ऑफीसर योगेश नवले, लिला कुऱ्हे,क्षेत्रीय विकास अधिकारी विवेक दातीर यांनी तीर्थाचीवाडी शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांना मुलांच्या मध्यान्ह भोजनावेळी ताज्या रसरशीत रान काकड्या दिसुन आल्या. यामुळे उपस्थित मान्यवरांनी मुख्याध्यापक श्री.वाकळे व श्री. राठोड यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
यामुळे ग्रामपंचायत सरपंच गिताबाई रावते, उपसरपंच सुनंदा आवारी, ग्रामसेवक किसन आवारी, सदस्य पंढरीनाथ बेणके, त्रिंबक पराड, कांताबाई बेणके, पोलीस पाटील हिरामण बेणके, शालेय व्यवस्थापन समितीची अध्यक्ष संजय डगळे, माजी उपाध्यक्ष रामदास डगळे,माजी विक्रीकर उपायुक्त मारूती डगळे,ग्रामस्थ तसेच पालकांनीही भरभरून कौतुक केले.
Website Title: Latest News Akole beautiful parasbaag 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here