Home अकोले अकोले: वरदविनायकच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

अकोले: वरदविनायकच्या दर्शनाला भाविकांची गर्दी

अकोले:चातुर्मास मास पर्वातील व सन २०१९ सालातील एकमेव आलेल्या अंगारखी चतुर्थी निमित्त मंगळवारी अकोले तालुक्यातील कोतूळ यथील आराध्यदैवत श्री वरदविनायक मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.  
         नवसाला पावणारा आशी ख्याती असलेल्या या मंदिरात परिसरातील अनेक गणेश भक्तांनी अनवाणी पाई येऊन श्री गणेशाचे दर्शन घेतले व आपली नवस पुर्ती केली. पहाटे पासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.संध्याकाळी मंदिरपरिसरात मोठी गर्दी झाली होती त्यामुळे. काही काळ कोतूळ राजूर रस्त्यावर  वाहतूक कोंडी झाली होती. पहाटे पाच वाजता प्रभात गीत गायनाने दर्शनाला सुरवात झाली.सकाळी सौ.वृषाली व विनय समुद्र यांच्या हस्ते अभिषेक व महापूजा करण्यात आली. दिवसभर श्री.आशुतोष घाटकर व जय भवानी संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने भाविकांना खिचडी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.भाविकांसाठी मंदिरात पिण्याचे पाणी खिचडी वाटप,अभिषेक व्यवस्था,देणगी कक्ष आदी सुविधा देवस्थानच्या वतीने करण्यात आल्या होत्या.संध्याकाळी सामुदाईक अथर्वशीर्ष पठणाचा आयोजन करण्यात आले होते. अथर्वशीर्ष पठणाचे नेतृत्व वेदिका  परशुरामी,सानिका हांडे,शुभांगी खाडे,सविता घाटकर,मीना आरोटे,प्रिया नेवासकर, प्रज्ञा भाटे,सुरेखा साळुंके,द्वारका पोखरकर,यांनी केले या  वेळी मोठ्या संखेने भाविक उपस्थित होते. भाऊ दाजी पाटील प्रतिष्ठानचे सचिव रविंद्र देशमुख यांच्या हस्ते आरती करण्यात आली.देवस्थानच्या वतीने अध्यक्ष प्रदीप भाटे यांनी त्यांचा सन्मान केला यावेळी,संभाजी पोखरकर, दिपक राउत,मुकुंद खाडे,तुकाराम आरोटे,,दत्तात्रय कोते,विशाल बोऱ्हाडे,अविनाश गीते,संतोष नेवासकर,गणेश घाटकर,वासुदेव साळुंके,विजय तोरकडे,निवृत्ती पोखरकर, रेवणनाथ देशमुख,सचिन आरोटे,आदी उपस्थित होते.मध्य रात्री पर्यंत भजनाच्या माध्यमातून गणेश जागर सुरु होता.
दिवसभरात अगस्ती देवस्थानचे विश्वस्त युवा कीर्तनकार दिपक महराज देशमुख, ह.भ.प.अजित महराज दिघे,जिल्हापरिषद सदस्य किरण लहामटे,रमेश देशमुख,माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सीताराम देशमुख,अगस्ती चे संचालक बाळासाहेव देशमुख,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सयाजी देशमुख,जामखेड येथील गणेश भक्त आत्माराम थोरे,माजी सरपंच रमेश देशमुख,सरपंच सौ. अनुसया धराडे,यांच्या सह अनेक मान्यवरांनी गणपतीचे दर्शन घेतले.
सध्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धाराचे काम सुरु असून मंदिरावर सुवर्ण कलश बसविला जाणार आहे आशी माहिती प्रा.संभाजी पोखरकर यांनी दिली.
Website Title: Latest News Akole Crowds of devotees visit Varadavinayak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here