Home अकोले अकोले : वाखारीमध्यें बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; पाडोशी परिसरात बिबट्याची दहशत

अकोले : वाखारीमध्यें बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार; पाडोशी परिसरात बिबट्याची दहशत

पिंपळगाव नाकविंदा : अकोले तालुक्यातील पोडोशी परिसरातील वाखारी येथील दिपक साबळे या शेतकऱ्याच्या गाभन शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला जागीच ठार केले आहे. हि घटना रविवार दिनांक ४ ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे.

पाडोशी परिसरातील वाखारी या ठिकाणी दिपक साबळे हे शेतकरी राहत आहेत. त्यांच्या राहत्या घरी बिबट्याने हल्ला केल्याने शेळीच्या मानेला जखम झाल्याने ति जागेवरच गतप्राण झाली. घटनेची माहिती समजताच वनविभागाचे कर्मचारी काशिनाथ मेंगाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. व मृत शेळीचा पंचणामा केला आहे. मृत शेळीचा पंचणामा करून तीला शेतात दफन करण्यात आले. या वेळी शेळी मालक दिपक साबळे, नितीन साबळे, गणेश साबळे, किसन साबळे, अनुसया साबळे, लहाणूबाई साबळे, वर्षा साबळे, यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या घटनेमुळे साबळे यांचे पंधरा ते विस हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.

बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरातील शाळकरी विद्यार्थी व शेतकऱ्यांमध्ये  प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ग्रामीण भागात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व्यवसाय करत असतात. त्यातच साबळे यांच्या शेळीवर झालेल्या हल्ल्यामुळे साबळे कुटूंबियांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सदर शेतकऱ्याला वनविभागाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी. तसेच बिबट्याला पकडण्यासाठी तातडीणने पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Website Title: Latest News Akole: Goat Kills Goat In Wakhari; Militant Terror In The Neighboring Area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here