Home अकोले आजोबानेच केले नातवाचे तुकडे तुकडे, आजोबा अटकेत

आजोबानेच केले नातवाचे तुकडे तुकडे, आजोबा अटकेत

अकोले: अकोले तालुक्यातील वाकी येथे एका तरुणाची हत्या करून मृतदेहाचे तुकडे तुकडे करून दोन गोण्या भरून कृष्णावती नदीपात्रात फेकून दिल्या होत्या. या घटनेचा तपास अवघ्या २४ तासांत लावण्यात पोलिसांना यश आले आहे.

अकोले तालुक्यात्तील वाकी येथील कृष्णावती नदीच्या पात्रात गुरुवारी सकाळी दोन गोण्यात मृतदेहाचे तुकडे तुकडे भरलेले आढळून आले होते. याबाबत खबर मिळताच राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला होता.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक सागर पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दीपक पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडित, अकोलेयाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे हे घटनास्थळी दाखल होऊन तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या २४ तासात या घटनेचा गुंता उलगडला आहे.

प्रदीप सुरेश भांगरे वय २५ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याचा आजोबा (मृताच्या आईचे वडील) कमलाकर हनुमंता डगळे याने आपणच नातवाचा खून केला आहे अशी कबुली तपासात देण्यात आली आहे असे नितीन पाटील यांनी सांगितले.

पोलिसांनी कमलाकर डगळे यांचा जबाब घेतला आहे.  हा खून कसा व का करण्यात आला याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.

Website Title: Latest News Akole Grandfather cut his grandson to pieces

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here