Home अकोले कोणत्याही परीस्थितीत अकोलेत एम. आय. डी. सी. आणणारच: आ.डॉ. किरण लहामटे

कोणत्याही परीस्थितीत अकोलेत एम. आय. डी. सी. आणणारच: आ.डॉ. किरण लहामटे

भंडारदरा / संजय महानोर:- आई घोरपडा मातेच्या आशिर्वादाने आणि माझ्या आदिवासी जनतेच्या दिलेल्या प्रेमानेच मी अकोले तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे ,  म्हणुनच आज अकोले तालुक्यातील प्रत्येक माझा माणुस आमदार आहे ,मी माझ्या जनतेशी गद्दारी करणार नसुन त्यांना योग्य तो न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे . जनतेच्या विश्वासाला कोठेही तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया अकोले तालुक्याचे आमदार किरण लहामटे यांनी रंधा धबधबा येथे आयोजित संक्रात मेळाव्यात काढले .

      अकोले तालुक्यातील अकोले तालुका आदिवासी समाज जाणिव जागृती संघर्ष समितीच्या वतीने  मकर संक्रातीच्या मुहुर्तावर नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .विधानसभेच्या निवडणुकीत बदल घडवुन आणणारे भाजपाचे जेष्ठ नेते अशोकराव भांगरे , तालुक्याचे आमदार किरण लहामटे तसेच जेष्ठ नागरीक विठ्ठल बापु खाडे यांचा समितीच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला . या मेळाव्यात बोलताना आमदार किरण लहामटे यांनी अकोले तालुक्याच्या  माजी मंत्र्यावर चांगलेच तोंडसुख घेतले . आदिवासी समाजात घुसखोरी ही माजी आदिवासी मंत्र्याच्याच कालावधीत झाल्याचे ते बोलले . मी आई घोरपडा मातेच्या आशिर्वादाने आणि माझ्या जनतेच्या जोरावर आमदार झालो आहे . माझ्या तालुक्यात सर्वात जास्त पाऊस पडतो म्हणुन पाण्यावर अगोदर आमचा हक्क आहे . प्रत्येक शेतक-याच्या शेतात अगोदर पाणी खेळले पाहीजे यासाठी आम्ही प्रयत्न करणारच असे ते म्हणाले . कोणत्याही परीस्थितीत अकोले तालुक्यात एम आय डी सी आणणारच असा शब्द त्यांनी याप्रंसगी जमलेल्या जनसमुदायाला दिला .

       या तालुक्यातील जनतेने ठरवलं तर काय होतं याचा प्रत्यय गेलेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने दाखवुन दिला आहे . आदिवासी बांधवांच्या प्रत्येक कार्यक्रमास मोठ्या जनसमुदायाने उपस्थिती लावा तरच माझ्या आदिवासी बांधवापर्यंत आपले विचार पोहचतील व आमचा आदिवासी सदृढ होईल ,आदिवासी समाज जोपर्यंत एकत्र येत नाही तोपर्यंत या समाजात प्रगती होणार नाही .तुम्ही आम्हाला निवडुन दिले आहेत त्याचे उपकार आम्हाला फेडायचे आहेत असे उद्गार सत्कारमुर्ती अशोक भांगरे यांनी काढले . अकोले तालुक्याचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी पंचायत समितीचा निकाल हा जनतेचा निकाल नाही , हिम्मत असेल तर जनतेतुन परत निवडुन येऊन दाखवाच असे आवाहन माजी आमदाराला केले . पुढील निवडणुक ही अकोले तालुक्यातील साखर कारखाण्याची असुन तो कारखाणा आम्हीच ताब्यात घेऊ व पहीली साखर बोनस म्हणुन अकोले तालुक्यातील जनतेला देऊ असेही या मेळाव्यात बोलताना त्यांनी सांगितले .

वाचा: संगमनेरात चोरट्याने एटीम कार्डसह ८७ हजार रु. लांबविले

या समितीने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे  आमदार किरण लहामटे , जेष्ठ नेते अशोकराव भांगरे , मारुती मेंगाळ , तुकाराम गभाले , हरीभाऊ अस्वले , शेंगाळ गुरुजी , विठ्ठल बापु खाडे , यमाजी लहामटे , आनंदराव खाडे , ह भ प देवराम महाराज ईदे , ह भ प नाथु महाराज भांगरे , गणपत पटेकर , मारुती लांघी , मंगळा पटेकर , धिरेन सगभोर , शरद कोंडार आदिसह मोठ्या प्रमाणात आदिवासी जनसमुदाय उपस्थित होता .

Website Title: Latest News Akole MIDC will bring Kiran Lahamte

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here