Home अकोले अकोले तालुक्यात निसर्ग चक्री वादळाच्या नुकसानीने शेतकऱ्याची आत्महत्या

अकोले तालुक्यात निसर्ग चक्री वादळाच्या नुकसानीने शेतकऱ्याची आत्महत्या

अकोले: तालुक्यातील टाहाकारी येथे निसर्ग चक्री वादळी पावसाने झालेल्या नुकसानीने एका शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. विलास दामू एखंडे वय ४९ असे या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

निसर्ग चक्री वादळाने झालेल्या नुकसानीतून आलेल्या नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली.  त्यांचा टोमॅटो पिकाचे नुकसान झाले तसेच २०० ते २५० गोणी कांदा भिजल्याने कांद्याचे नुकसान झाले. कांदा आणि टोमॅटोच्या झालेले नुकसानीतून तसेच पिक उभारण्यासाठी पैसे उसने घेतले होते. मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कोठून आणायचा. लोकांच्या पैशाची परतफेड कशी करायची या धक्याने त्यांनी औषध प्राशन केले. औषध प्राशन केल्यानंतर कवडदरा येथील एस.एम.बी.टी. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु उपचार करण्याअगोदरच त्यांची प्राणज्योत मालवली. तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Website Title: Latest News Akole taluka Farmer commits suicide due to damage 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here