Home अकोले अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नंदकुमार मंडलिक तर सेक्रेटरी पदी श्रीनिवास...

अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी नंदकुमार मंडलिक तर सेक्रेटरी पदी श्रीनिवास रेणुकादास

अकोले: अकोले तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्ष पदी वृत्तपत्र छायाचित्रकार नंदकुमार मंडलिक तर सेक्रेटरी पदी श्रीनिवास रेणुकादास यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. अकोले तालुका पत्रकारसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अकोले येथील शासकीय विश्रामगृहावर संघाचे मावळते अध्यक्ष श्रीनिवास रेणुकादास यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या प्रारंभी संघाचे मावळते सेक्रेटरी सुनील गीते यांनी गत वार्षिक सभेचे इति वृत्त वाचन केले . श्रीनिवास रेणुकादास यांनी आपल्या कार्यकाळातील कामाचे आढावा सर्वासमोर मांडला .

यानंतर कार्यकारणी निवडण्यात आली. यामध्ये सहसेक्रेटरी पदी प्रवीण धुमाळ , उपाध्यक्ष पदी अल्ताफ शेख ,विनायक घाटकर ,संजय महानोर,संजय उकिरडे ,खजिनदार विलास तुपे,संपर्क प्रमुख विनय समुद्र प्रकल्प प्रमुख हरिभाऊ आवारी ,कार्यकारणी सदस्य प्रा. बाळासाहेब मेहेत्रे ,गोकुळ कानकाटे,सुनील गीते, सुभाष खरबस ,राजेंद्र जाधव ,राजेंद्र उकिरडे ,गोरक्ष घोडके , रमेश खरबस, युवराज हंगेकर ,आबासाहेब मंडलिक , आनासाहेब चौधरी ,यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना श्री. मंडलिक व रेणुकादास म्हणाले कि,आमच्यावर जो विश्वास टाकला आहे. त्याला कदापि तडा जाऊ देणार नाही. वर्षभर विविध उपक्रम आपण सभासदांच्या सहकार्यातून राबऊ . सभासदांचे हितासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली . या उभय पदाधिकाऱ्यांचा अगस्ती साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत आ. वैभवराव पिचड व जिल्हा बँकेचे चेअरमन सीताराम गायकर यांचे हस्ते सत्कारही करण्यात आला.

Website Title: Latest News Akole Taluka Journalist president

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here