Home अकोले अकोले तालुक्यात डेंगूच्या तापाने शिक्षकाचा बळी

अकोले तालुक्यात डेंगूच्या तापाने शिक्षकाचा बळी

अकोले: अकोले तालुक्यातील नवलेवाडी परिसरातील आदिवासी भागातील नुतन माध्यमिक विद्यालय पांजरे येथील शिक्षक भीमा धोंडीबा गुंजाळ यांचे काल नाशिक येथे डेंगू सदृश्य आजारावर उपचार घेत असताना काल प्राणज्योत मालवली. या अगोदर देखील या रोगाने अनेकांचा बळी गेला आहे. नगरपंचायत व पंचायत समितीच्या आरोग्य विभागाचे निष्क्रिय कारभारामुळे आतापर्यंत बळीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी प्रशासनाला जाग का येत नाही? असा सवाल उपस्थित होत आहे.

नगर जिल्ह्यातील सर्व रुग्णालये या आजाराने भरले असून काही रुग्णालयात प्राथमिक उपचार अनेक दिवस करतात. मात्र काही क्षणातच पुढील रुग्णालयाकडे जाण्याचा सल्ला दिला जातो.

Website Title: Latest News Akole Teacher succumbs to dengue fever

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here