Home संगमनेर संगमनेर: भाजीपाल्याच्या नावाखाली गोमांसाची वाहतूक सुरूच

संगमनेर: भाजीपाल्याच्या नावाखाली गोमांसाची वाहतूक सुरूच

संगमनेर: गेल्या पंधरा दिवसांपूर्वी वावी पोलिसांनी गोमांस वाहणाऱ्या तीन गाड्या जप्त केल्या होत्या त्यातच आता पुन्हा करोनाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र संचारबंदी व लॉकडाऊन असताना भाजीपाल्याच्या नावाखाली संगमनेरातून मुंबईकडे गोमांसाची वाहतूक सुरूच आहे. काल शनिवार दिनांक २५ रोजी संगमनेरहून बेकायदेशीररीत्या जनावरांचे मांस घेऊन जाणाऱ्या ट्रकवर नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पाथरे गावाच्या शिवारात सिन्नर शिर्डी रोडवर वावी पोलिसांनी कारवाई करण्यात आली आहे. या ट्रकमध्ये टरबूजखाली हे मांस ठेवले होते. सुमारे १००० किलो मांस जप्त करत वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे लॉकडाऊन काळातही संगमनेरमध्ये अवैध कत्तलखाणे सुरु असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

नाशिक जिल्हयातील सिन्नर तालुक्यात पाथरे गावाच्या शिवारात सिन्नर शिर्डी रस्त्यावर हि कारवाई करण्यात आली. सलाम गुलाम मोहम्मद अन्सारी वय २२ आणि गुलफाम मोहम्मद अन्सारी वय २३ दोघे इदिरानगर,कुर्ला कसाईवाडा,मुबई असे आरोपीचे नावे असून टाटा एस मेगा मालट्रक (एम एच ०३,सीपी ३६८२) या गाडीमध्ये संगमनेरहून मुबईकडे मांस घेऊन चालेले होते. ट्रक पोलीसांनी पकडत त्यातील एक लाख रुपये किमतीचे एक हजार किलो मांस दोन लाख रुपयाचा टेम्पो आणि सहा हजार ९००० रुपये किमतीचे टरबूज असा एकूण तीन लाख सहा हजार ९०० रुपायचा मुदेमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस संदीप नगरे यांनी फिर्याद दिली. संगमनेरचे गोमांस मुंबईला मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येते, त्यामुळे संगमनेर हे गोमास विक्रीचे सर्वात मोठे केंद्र बनले आहे. शहरातील कत्तलीमुळे हिदुत्ववादी संघटनाही आक्रमक झाल्या असून त्यांनी शहरातील सर्व कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली आहे.  

Website Title:  Latest News Beef continues to be transported Sangamner 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here