अकोले तालुक्यात वृद्धाची गळफास घेऊन आत्महत्या
अकोले: तालुक्यातील बेलापूर बाभूळवाडी ब्राम्हणवाडा येथील एका ६० वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी सात च्या सुमारास घडली.
खंडू धोंडीबा आरोटे वय ६० रा. बेलापूर बाभळवाडी ता.अकोले असे या मयताचे नाव आहे. खंडू आरोटे यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामागचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
याबाबत पोलीस पाटील शिवाजी खंडे यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल भोसले हे करीत आहे.
Website Title: Latest News committed suicide in Akole taluka