Home अकोले अकोले: मराठा समाजाला आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकवले बद्दल देवेंद्र फडणवीस यांचा...

अकोले: मराठा समाजाला आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकवले बद्दल देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार

अकोले: मराठा समाजाला आरक्षण देऊन ते न्यायालयात टिकवले बद्दल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार अखिल भारतीय मराठा महासंघाचे वतीने प्रदेश संपर्कप्रमुख संभाजीराजे दहातोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रतिमा भेट देऊन करण्यात आला. संपूर्ण राज्यभर मुख्यमंत्री यांचे स्वागत व सत्कार युवक युवती करीत आहे.
        अकोले येथे महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने मुख्यमंत्री आले असता मराठा महासंघाचे प्रदेश संपर्क प्रमुख संभाजीराजे दहातोंडे, कु मानसी वाडेकर,  सिद्धी धुमाळ, अक्षदा धुमाळ, प्रगती वैद्य, मनीषा भोर, हर्षदा वाकचौरे, स्वराज गवांदे, प्रथमेश सहाणे, अभिषेक वाकचौरे युवक व युवती यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
       मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला असून विद्यार्थी व नोकरीसाठी युवकांना आरक्षणाची अत्यंत गरज होती अनेक नेत्यांनी अन पक्षांनी समाजाचा फक्त मतासाठी वापर केला मात्र देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजासाठी आरक्षण लागु करून समाजाच्या दृष्टीने अतिशय उत्तम कामगिरी केली त्यामुळं युवक व युवतींनी त्यांचा सत्कार केला. 
      यावेळी पालकमंत्री ना राम शिंदे, आमदार वैभवराव पिचड, जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, मराठा महासंघाचे जिल्हा अध्यक्ष राज गवांदे, युवक जिल्हाध्यक्ष ओम काळे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे पाटील, युवक अध्यक्ष अक्षय अभाळे, शिक्षक अध्यक्ष किशोर धुमाळ, सुशांत वाकचौरे, अशोक आवारी, ईश्वर वाकचौरे उपस्थित होते.
Website Title: latest News Devendra Fadnavis felicitated Maratha Reservation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here