Home अहमदनगर Latest News: पत्रकारावर हल्ला, तीन जणांना अटक

Latest News: पत्रकारावर हल्ला, तीन जणांना अटक

श्रीगोंदा: श्रीगोंदा येथील पत्रकार शिवाजी साळुंके हे सोमवारी औटेवाडी येथील कुकडी वितरिकेवर भगदाडचे फोटो व वार्तांकनासाठी गेले असता येथे पाच ते सहा जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. जमावबंदीचे उल्लंघन यांनी केले आहे. याप्रकारामुळे पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे.

पत्रकार शिवाजी साळुंके यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी लक्ष घालून कामकाज सुरु आहे. पोलीस अधीक्षक संजय सातव यांच्या नेतृवाखाली पोलीस पथकाने औटीवाडीत जाऊन मंगळवारी पहाटे तिघा जणांना अटक केली आहे. यातील दोन आरोपी मोबाईल बंद करून फरार झाले आहेत.

याप्रकरणी दशरथ अण्णा औटी, आबा सखाराम औटी, ज्ञानदेव औटी, आबा औटी, भरत औटी सर्व रा. श्रीगोंदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी श्रीगोंद्यातील पत्रकारांनी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव याची भेट घेऊन आरोपींना अटक करावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर पोलीस अधीक्षक संजय सातव यांनी तपास घेऊन तीन जणांना अटक केली आहे.

Website Title: Latest News Journalist attack three arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here