Home अहमदनगर नगर : अकोल्याचे आमदार वैभव पिचड पक्ष सोडणार नाहीत; राष्ट्रवादी जिल्हा...

नगर : अकोल्याचे आमदार वैभव पिचड पक्ष सोडणार नाहीत; राष्ट्रवादी जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांचे स्पष्टीकरण

नगर : ‘पक्षाचे अकोल्याचे आमदार वैभव पिचड पक्ष सोडून जाणार असल्याच्या चर्चेत तथ्य नाही. मुख्यमंत्र्यांना कोणी भेटले म्हणजे लगेच त्यांनी पक्ष सोडला, असे म्हणणे चुकीचे आहे. आमदार पिचड पक्ष सोडणार नाहीत’, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी दिलीप वळसे यांनी केला. राष्ट्रवादी इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ‘मधुकर पिचड पक्ष स्थापनेपासून पक्षाचे नेते शरद पवारांना मानतात. त्यांच्यासमवेत त्यांनी काम केले आहे.

ते पक्षाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत. त्यामुळे त्यांचे चिरंजीव आमदार वैभव पिचड पक्ष सोडणार नाहीत, असे काही घडणारही नाही’, असे सांगून वळसे म्हणाले, ‘कोणी मुख्यमंत्र्यांना भेटले म्हणजे त्यांनी पक्ष सोडला, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. मतदारसंघातील विकास कामांनिमित्त आम्हीही मुख्यमंत्र्यांना भेटत असतो. तसे तेही काही कामानिमित्तानेच मुख्यमंत्र्यांना भेटले असतील आणि त्यांच्यासमवेत राधाकृष्ण विखे असल्याचे सांगितले जात असले तरी विखे आता सत्तेतील मंत्री आहेत. त्यामुळे ते तेथे असू शकतात.

वैभव पिचड यांच्याशी बोलणे झाले आहे व ते पक्षाकडून उमेदवारीबाबत मुलाखत देणार आहेत’, असेही वळसेंनी स्पष्ट केले. 

Website Title: Latest News Nagar: Akola MLA Glorious Will Not Leave A Picade Party; Explanation Of Dilip Walsey In Charge Of NCP District

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here