Home महाराष्ट्र खातेवाटप: राष्ट्रवादीसाठी पवारांची पॉवर तर शिवसेनेसाठी हा घाटे का सौदा

खातेवाटप: राष्ट्रवादीसाठी पवारांची पॉवर तर शिवसेनेसाठी हा घाटे का सौदा

मुंबई: महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत असले तरी सरकारमध्ये वरचष्मा मात्र या आघाडीचे शिल्पकार व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाच दिसत आहे. आधी मंत्रिमंडळ विस्तारात आणि आता खातेवाटपातही वजनदार’ खाती आपल्याकडे घेत पवारांनी आपली ‘पॉवर’ दाखवली आहे. विशेष म्हणजे अनिल देशमुख,  डॉ. जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ या राष्ट्रवादीतील निष्ठावंत नेत्यांच्या पदरी महत्त्वाच्या खात्यांचे जबाबदारी टाकत पवारांनी त्यांच्या निष्ठेची कदर केली आहे.

राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेल्या खात्यांचा विचार करता शिवसेनेकडे तुलनेने कमी महत्त्वाचीच खाती आली आहेत. खातेवाटपावर नजर टाकल्यास आपल्या लक्षात येईल की, शिवसेनेसाठी हा घाटे का सौदा’ ठरला असे म्हणावे लागेल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे सामान्य प्रशासन, विधी व न्याय माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क,  ही मोजकीच खाती आपल्याकडे ठेवली आहेत. नंतर शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) ही खाती आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार खात्यांची जबाबदारी असेल.

सुभाष देसाई यांना उद्योग, खनिकर्म, मराठी भाषा या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. अॅड. अनिल परब हे नवे परिवहन व राजशिष्टाचार खाते देण्यात आले आहे. उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण तर दादाजी भुसे यांना कृषी खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांचे मात्र पक्षातील वजन वाढल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कोकणातील दीपक केसरकर, भास्कर जाधव या अनुभवी नेत्यांना मागे टाकत थेट कॅबिनेट मंत्रिपदी(उच्च व तंत्रशिक्षण) मिळवण्यात यश आले आहे.   

Website Title: Latest News Pawar power in Account

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here