अकोले: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर, आरोग्यसेविका, आशासेविका, स्वच्छता कर्मचारी यांच्या संरक्षणा साठी पी पी ई किट, सॅनिटायझर, मास्क, हँडग्लोज चे वाटप खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी खेमानंद फाउंडेशन च्या वतीने करण्यात आले.
अकोले पंचायत समितीमध्ये तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, आरोग्यअधिकारी डॉ इंद्रजित गंभीरे, ग्रामीण रुग्णालयाचे डॉ दशरथ धांडे, तालुका समूह संघटक रोहिणी भांगरे, गटप्रवर्तक अनिता शिळकांदे, सुपरवायझर विलास शेळके यांच्यासह भाजप तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, शिवसेना शहर अध्यक्ष नितीन नाईकवाडी, नगरसेवक प्रमोद मंडलिक, शिवसेना तालुका समनव्यक रावसाहेब वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप शेणकर भाजयुमो उपाध्यक्ष सुशांत वाकचौरे खासदार यांचे स्वीय सहाय्यक शिवाजी दिशागत आदी उपस्थित होते
तहसील कार्यालयात कोरोनाच्या आढावा बैठकीत खासदार लोखंडे यांनी गावपातळीवर जनतेशी थेट संबंध येणारे कर्मचारी आशासेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्यसेविका, डॉक्टर आहेत त्यांना सॅनिटाझर व मास्क ची गरज असून त्यांचे संरक्षण करण्यासाठी या वस्तू आवशयक आहेत. यांना स्वखर्चाने या वस्तू देणार असे सांगितले होते त्याचे वाटप आज करण्यात आले.
अकोले तालुक्यातील पंधरा प्राथमिक आरोग्य केंद्र च्या वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी पी पी ई किट म्हणजे स्वसंरक्षण साहित्य देण्यात आले आहे. डॉक्टर यांचा आजारी व्यक्तीशी थेट संपर्क येतो म्हणून हे साहित्य देण्यात आले
यावेळी खासदार लोखंडे म्हणाले की, अकोले तालुका आढावा बैठकीत तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी हे साहित्य आवश्यक असलेच सांगितले मुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वांना हे साहित्य देता आले. या तालुक्यातील सर्व कर्मचारी अतिशय उत्तम काम करीत असलेमुळे या तालुक्यात एकही कोरोना पोजिटिव्ह रुग्ण नाही यामुळे सर्व कौतुकास पात्र आहेत. मतदारसंघातील सर्व साखर कारखान्याच्या पदाधिकारी यांचे बरोबर बोलून गोरगरीब जनतेला खाण्याची व्यवस्था करावी असे सांगितले आहे. साईबाबा संस्थान ला विनंती केली असून जिल्ह्यासाठी सहाशे ताप तपासणी टॉर्च देण्यात याव्या अशी मागणी केली आहे. त्याही मिळणार असून संस्थानच्या वतीने फूड पॅकेट तयार करून तहसील कार्यालय मार्फत वाटप करावे याबाबद ही निर्णय होईल असेही खासदार लोखंडे यांनी सांगितले.
Website Title: Latest News Sadashiv lokhande Distribute sanitizers