Home अकोले अकोले तालुक्यात सरपंचाना सात जणांकडून बेदम मारहाण

अकोले तालुक्यात सरपंचाना सात जणांकडून बेदम मारहाण

अकोले: कुमशेत येथील सरपंच व करोना प्रादुर्भाव नियोजन समितीचे अध्यक्ष सयाजी तुकाराम अस्वले यांना सात जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.

देशात व राज्यात सगळीकडे करोना सदृश्य परीस्थिती आहे. जिल्हाधिकारी यांचा १४४ प्रतिबंधात्मक आदेश आहे. त्यानुसार सरपंच सयाजी अस्वले यांनी ग्रामस्थांना बोलावून नियोजन सुरु केले होते. वास्तविकता कुमशेत हे गाव अतिदुर्गम आहे. गावाच्या सहा वाड्या आहेत. पर्यटन स्थळ असल्याने गावात ये जा सुरु असते. गेली १५ दिवसांपासून ठाणे मुंबई या ठिकाणाहून सादडा घाट, पाथरा घाट, गुहीरीचा दरा या मार्गाने अनेक लोक पायी येत असून त्यांचा येण्याचा मार्ग कुमशेत आहे. तीन दिवसांपूर्वी २२ मजूर परभणी, जालना येथून आले असताना त्यांना अटकाव करून राजूर पोलिसांना कळविले होते.

वाचा: संगमनेर शहरात ट्रक दुकानात घुसल्याने मोठे नुकसान

त्यांना शिरपुंजे आश्रम शाळेत कॉरांटाइन करण्यात आले होते. तसेच गावातील मजुरांना इतर ठिकाणाहून मदत येत असून त्यांचे नियोजन चालू असताना अमोल इंदोरे, बंडू अस्वले, सोपान अस्वले, गोरक्ष अस्वले, मच्चीन्द्र इंदोरे, एकनाथ इंदोरे, अंकुश अस्वले आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात घुसून सरपंचअस्वले यांना मारहाण केली. याबाबत राजूर पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे.

Website Title: Latest News Sarpanch beaten seven persons in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here