Home अकोले भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुकाध्यक्षपदी जेष्ठ नेते सिताराम भांगरे

भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुकाध्यक्षपदी जेष्ठ नेते सिताराम भांगरे

अकोले: भारतीय जनता पार्टीच्या अकोले तालुकाध्यक्षपदी जेष्ठ नेते सिताराम भांगरे यांची फेरनिवड करण्यात आली

भारतीय जनता पार्टी निवडणूक २०२० ते २०२३ सालाकरिता तालुका कार्यकारणी साठी बैठक पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी मंत्री मधुकरराव पिचड, वैभवराव पिचड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश चित्ते आदी उपस्थित होते.

        भारतीय जनता पार्टी बैठक च्या सुरवातीला निवडणूक अधिकारी प्रकाश चित्ते यांनी निवडणूक कार्यक्रम घोषित केला त्यावेळी सर्वांचे मत अजमावून सिताराम भांगरे यांचे नाव जाहीर केले.

        सिताराम भांगरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहे. १९८४ साली भारतीय जनता पार्टीची स्थापना अकोले तालुक्यात करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. पाहिले तालुका सरचिटणीस म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. भाजपचे तालुकाध्यक्ष पद, जिल्हा चिटणीस, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष, भाजयुमो चे प्रदेश कार्यकारणी सदस्य, अश्या पदावर कार्यरत होते. वृद्ध कलावंत मानधन समितीचे अध्यक्षपद ही त्यांनी भूषविले आहे. अकोले तालुक्यात भाजपच्या वाढीस त्यांनी अतीशय मोलाचे योगदान असून राममंदिर आंदोलन, डंकेल प्रस्ताव मोर्चा दिल्लीत असेल असे कार्यात त्यांचा सहभाग होता. अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकित शंभर टक्के यश मिळवले आहे.

         यावेळी सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे, उपसभापती दत्तात्रय देशमुख, शिवाजी धुमाळ, गिरजाजी जाधव, माजी जिप उपाध्यक्ष सिताराम देशमुख, वसंत मनकर, अमृतसागर दूध संघाचे व्हा. चेअरमन रावसाहेब वाकचौरे, अगस्तीचे संचालक अशोक देशमुख, भाऊसाहेब वाकचौरे यांची मते जाणून घेतली.

          यानिवडीचे संघटनमंत्री विजय पुराणिक,  माजी पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सिताराम गायकर, प्रा भानुदास बेरड, जेष्ठ नेते मधुकर नवले, भाजप जिल्हा परिषद गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी अभिनंदन केले.

Website Title: Latest News Sitaram Bhangare, senior leader of Akole taluka in BJP

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here