Home अकोले अकोले तालुक्यात सुनिल धुमाळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

अकोले तालुक्यात सुनिल धुमाळ यांना राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार प्रदान

पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी: विदयार्थी जडणघडणीत शाळेचे मुख्याध्यापक हे शाळा व समाज यातील महत्वाचा दुवा म्हणून कार्य निभावत असतात. मुख्याध्यापक म्हणून आपल्या अंगी असलेले नेतृत्व गुण आणि अचूक निर्णय क्षमतेच्या जोरावर संस्थाचालक, शिक्षक व पालकांमध्ये समन्वय राखुन प्रशालेत विविध उपक्रम राबवून प्रशाला नावारूपाला आनने तसेच अंगी असणारी सेवाभावी वृत्ती तसेच विदयार्थ्यांप्रती असलेली समर्पणाची भावना मनी बाळगुन प्रशालेत अनेक कौशल्यात्मक व सकारात्मक बदल घडवून आणने त्यामुळे आपली प्रशाला आदर्शवत करण्यात यश प्राप्त होते. हे सर्व कार्य आदर्शवत असल्यामुळे सन २०१९मधील राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार अकोले तालुक्यातील महालक्ष्मी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा येथील विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल आबाजी धुमाळ यांना प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ मुंबई यांचे वतीने ५९वे राज्यस्तरीय अधिवेशन ऑर्किड स्कूल सोलापुर येथे नुकतेच संपन्न झाले. याप्रसंगी राज्यभरातील एकूण ४८ आदर्श मुख्यध्यापकांना पुरस्कार देण्यात आले. यापैकी अकोले तालुक्यातील राज्यस्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार सुनिल धुमाळ यांना विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित सन्मानपुर्वक प्रदान करण्यात आला.
या प्रसंगि खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील, शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, अधिवेशनाचे माजी अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड, नूतन अध्यक्ष संभाजी पाटील, उपशिक्षणाधीकारी सुधा साळुंखे, तानाजी माने, सुभाष माने, स्वागताध्यक्ष कुमार करजगी, विजयसिंह गायकवाड, आदिनाथ थोरात, अरूण थोरात, के.के. पाटील, सुलभा वठारे, डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी, डॉ. शिवरत्न शेटे, आ. भारत भालके आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापक सुनिल धुमाळ यांना यापुर्वी देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अकोले तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेला आहे. या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अॅड. वसंतराव मनकर,सेक्रेटरी मंगेश नवले, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडीत, बाळासाहेब वाकचौरे, शांताराम डोंगरे, बाळासाहेब कळसकर, अंतुराम सावंत, गोरख वाकचौरे, गोरक्षनाथ आवारी यांसह तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
Website Title: Latest News State Level Ideal Headmaster Award Sunil Dhumal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here