Home संगमनेर संगमनेर: डोक्यात कुऱ्हाड मारून चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप

संगमनेर: डोक्यात कुऱ्हाड मारून चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी जन्मठेप

Sangamner Life imprisonment for killing his cousin by hitting him on the head with an ax

Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथे शेतातील  बांधाच्या वादातून डोक्यात कुऱ्हाड मारून चुलत भावाचा खून केल्याप्रकरणी संगमनेर येथील सत्र न्यायधीश वाय. एच. अमेठा यांनी आरोपी गोरख संपत यादव यास जन्मठेपेची शिक्षा (Life imprisonment ) व २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर येथील सतीश छबू यादव (वय ३६) याने चुलता संपत यादव याने बांध कोरला म्हणून चुलत्याच्या मुस्काटात मारली. संपत यादव यांचा मुलगा गोरख यादव याने हा राग मनात ठेवून १० मे २०२० रोजी प्रकाश यादव याच्या कौठे कमळेश्वर येथील शेतातील घरासमोर सतीश छबू यादव यांच्या डोक्यात कुन्हाडीचे वार करीत गंभीर जखमी केले. सतीश यास लोणी येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी मयत सतीश यादव याचे वडील छबू महादू यादव यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी संगमनेर येथील सत्र न्यायधीश वाय. एच. अमेठा यांच्या समोर झाली. या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. तर बचाव पक्षातर्फे प्रकाश यादव यांची साक्ष घेण्यात आली. न्यायालयासमोर सरकारी वकील मच्छिंद्र गवते यांनी सबळ पुरावा सादर केला. त्यानंतर न्यायालयाने आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

Web Title: Sangamner Life imprisonment for killing his cousin by hitting him on the head with an ax

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here