‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या पार्टनरनेच मुलीला पेटवले
Mumbai Crime: आईसोबत ‘लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने २० वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून (Fire) दिल्याची धक्कादायक घटना.
मुंबई : आईसोबत ‘लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या पार्टनरने २० वर्षीय मुलीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना धारावीत घडली. यामध्ये मुलगी ६० ते ७० टक्के भाजली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी धारावी पोलिसांनी नंदकिशोर पटेल (४१) याला अटक केली आहे. परिसरात खळबळ उडाली आहे.
धारावीतील राजीव गांधी नगर परिसरात राहणाऱ्या मुलीची आई पटेलसोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. रात्री पावणेबाराच्या सुमारास तरुणी शेजारी राहणाऱ्या मुलाने आणलेले नुडल्स आणण्यासाठी घराबाहेर पडताच घराबाहेर दबा धरून बसलेल्या पटेलने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
Web Title: live-in partner who set the girl on fire
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App