Home क्राईम एलएलबीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट आढळली

एलएलबीच्या विद्यार्थिनीची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोट आढळली

Dhule Crime News: देवपूर भागात असलेल्या विद्या भवन महिला वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या (Suicide)  केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

LLB student commits suicide by hanging herself in the hostel

धुळे:  धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या विद्या भवन महिला वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थीनीने आपले जीवन संपविले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथील एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत असलेल्या साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील एका विद्यार्थिनीने आज दुपारच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

भारती अमृत चौरे (वय 23) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही विद्यार्थिनी साक्री तालुक्यातील दातर्ती गावातील राहणारी आहे. ती सध्या धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथे एलएलबीच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. या विद्यार्थिनीने दोन महिन्यापूर्वीच महिला वसतिगृहात प्रवेश घेतला होता. कालच, सोमवारी ती पुन्हा वसतिगृहात आली होती. तिच्या रूम वरील मैत्रीण ही गावाला गेली होती म्हणून ती काल पासून रूममध्ये एकटीच होती. ही संधी साधून आज भारती चौरे हिने आज सकाळच्या सुमारास हॉस्टेल मधील रूममध्ये असलेल्या पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली असल्याची माहिती आहे.

आज दुपारच्या सुमारास भारती चौरे हिची मैत्रीण तिला बोलवण्यासाठी रुमवर गेली. त्यावेळी तिने दरवाजा उघडलाच नाही. तिच्या मैत्रिणीला शंका आल्यामुळे तिने खिडकीमधून पाहिले तर भारती चौरे हिने दोरीच्या साह्याने पंख्याला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.

यानंतर घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस  वसतिगृहामध्ये दाखल झाले. त्यांनी रूम तोडून आतमध्ये प्रवेश केला. खोलीमध्ये भारती चौरे हिने लिहिलेली एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये तिने ‘आई पप्पा सॉरी’ असे म्हटले होते. या सुसाईड नोटमध्ये ती खूप तणावात असल्याची माहिती मिळाली. त्यातून  तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे संपूर्ण हॉस्टेलमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  भारती चौरेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथे पाठवण्यात आला आहे.

Web Title: LLB student commits suicide by hanging herself in the hostel

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here