कोपरगावात लव्ह जिहाद घटना: युवतीचे बळजबरीने धर्मांतरण, मौलवीसह पाच जणांवर गुन्हा
Ahmednagar News: धर्मांतरासाठी लग्न करण्यासाठी दबाव (Love Jihad). बळजबरीने धर्मांतर करत नमाज पठण करण्यास, दोघांना पोलिसांनी अटक.
कोपरगाव | Kopargaon: अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव येथील इंदिरापथ भागातील 20 वर्षीय युवतीस प्रेमाच्या जाळयात ओढून तिची फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. तिला व तिच्या घरातील लोकांना जिवे मारण्याची धमकी देत खडकी येथील मदरशात बळजबरीने नेवून चौघांनी तिच्यावर अतिप्रसंग केला. युवतीच्या मर्जीविरोधात शरीरसंबंध करुन त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करण्यात आले. त्यांनतर सदर युवतीस ब्लॅकमेल करुन इंदौर येथे बोलावून तिच्यावर पुन्हा अतिप्रसंग केला. तसेच बळजबरीने धर्मांतर करत नमाज पठण करण्यास सांगिल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला इंदौरच्या मौलवीसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी इंदिरापथ कोपरगाव येथील 20 वर्षीय युवतीने फिर्याद दाखल केली असून फिर्यादीवरून सायम कुरेशी (रा. जुना पिठा इंदौर मध्यप्रदेश), इमरान अयुब शेख (रा. कोपरगाव), छोटू उर्फ कलिम (पूर्ण नांव माहित नाही), फय्याज (पूर्ण नांव माहित नाही) व इंदौर येथील मौलवी अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक मिळालेली माहिती अशी की, आरोपी सायम कुरेशी याने तीन वर्षापूर्वी मोबाईलवरुन फिर्यादीशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर एक वर्षाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढत २१ मे रोजी सकाळी 6 ते 12 वाजेच्या दरम्यान कुरेशी याने फिर्यादी व तिच्या घरच्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांनी त्यास विरोध केला असता आरोपींनी संगनमताने फिर्यादीचे हातपाय धरून तिच्या जात लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. तिला बळजबरीने तिच्याच मोटरसायकलवर ट्रिपल सिट बसून खडकी जवळील मदरशात घेऊन गेले. आरोपी सायम याने तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध ठेवले. त्याचे फोटो व व्हिडिओ तयार करून ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीस इंदौर येथे बोलावून घेतले, तेथे देखील एका घरात आरोपी सायम याने फिर्यादीशी बळजबरीने अतिप्रसंग केला. त्यानंतर इंदौर येथील एका मौलवीकडून बळजबरीने फिर्यादीस नमाज पठण करण्यास लावले. तसेच धर्मांतरासाठी आरोपी सायम बरोबर लग्न करण्यासाठी दबाव आणला. सदर गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके रवाना झाली असल्याची माहिती तपासी अधिकारी भरत दाते यांनी दिली.
Web Title: Love Jihad incident in Kopargaon: Forced conversion of young woman, five persons including cleric booked
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App