Home बुलढाणा विदर्भ एक्प्रेस खाली उडी घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या, धक्कादायक प्रकार

विदर्भ एक्प्रेस खाली उडी घेऊन प्रेमीयुगलाची आत्महत्या, धक्कादायक प्रकार

Suicide Case:  प्रेमीयुगलाची सुपरस्टार एक्स्प्रेस खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

Lovers commit suicide by jumping down Vidarbha Express

बुलढाणा:  जिल्ह्यातील शेगाव  रेल्वे स्थानकापासून जवळच एका तरुण व  तरुणीने रात्री शेगाव ते नागझरी दरम्यान नागपूर हुन मुंबईकडे जाणाऱ्या सुपरस्टार एक्स्प्रेस खाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल घडली आहे. यातील मयत  तरुण हा जवळच असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील कवठलं गावचा २२ वर्षीय अजय असल्याची ओळख पटली आहे. तर १४ वर्षीय युवती ही त्याच परिसरातील असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे

गुरुवारी रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास गोंदिया- मुंबई सुपरफास्ट विदर्भ एक्स्प्रेस शेगावकडे येत असताना नागझरी ते शेगाव दरम्यान व शेगाव रेल्वे स्थानकापासून जवळ नागरिकांना दोघांचे मृतदेह रेल्वे मार्गावर आढळून आल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी दोघांचे मृतदेह जवळच्या शासकीय रुग्णालयात आणले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

दोघांची ओळख पटली असून दोघे प्रेमी युगुल असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली असून यातील मुलगी ही फक्त १४ वर्षांची असून युवक २२ वर्षांचा आहे. दोघेही जवळच्या संग्रामपूर तालुक्यातील कवठल परिसरातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली , मात्र त्यांनी आत्महत्या का केली…? यांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ही आत्महत्या आहे की घातपात यावर आता पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Lovers commit suicide by jumping down Vidarbha Express

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here