Home महाराष्ट्र मोठी बातमी: LPG गॅस घरगुती सिलिंडर दरात मोठी कपात, केंद्र सरकारची घोषणा

मोठी बातमी: LPG गॅस घरगुती सिलिंडर दरात मोठी कपात, केंद्र सरकारची घोषणा

lpg gas price reduces upto 200 rupees

नवी दिल्ली: देशभरात गॅसदरवाढीची झळ बसलेल्या नागरिकांना केंद्र सरकारनं मोठा दिलासा मिळणार आहे. स्वयंपाक घरातील एलपीजी गॅस आता २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी याबाबत घोषणा केली आहे.

हजार रुपयांच्या दरात पोहचलेला गॅस सिलिंडर आता उज्ज्वला योजनेंतर्गत २०० रुपयांनी स्वस्त होणार आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

घरगुती गॅस सिलिंडरसाठी २०० रुपये सबसिडी केंद्रसरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ही योजना वर्षाला १२ सिलेंडरसाठी लागू राहील. याचा फायदा देशातील ९ कोटी जनतेला होणार आहे.

दरम्यान, पेट्रोल ९.५ रुपयांनी, तर डीझेल ७ रुपयांनी स्वस्त होणार आहे. अशीही घोषणा सीतारामन यांनी आज शनिवारी केली.

Web Title: lpg gas price reduces upto 200 rupees

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here