Home महाराष्ट्र Maharashtra Corona update :  महाराष्ट्रातील आजचे कोरोना अपडेट

Maharashtra Corona update :  महाराष्ट्रातील आजचे कोरोना अपडेट

Maharashtra Corona update Today 38k

Maharashtra Corona update : | मुंबई : राज्यात आज चाळीस हजाराच्या आत रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णसंख्येत चढ उतार सुरु आहे. गेल्या 24 तासात राज्यात कोरोनाच्या  39 हजार 207  नव्या रुग्णांची वाढ झाली असून 53 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 38, 824 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज रुग्णसंख्येत घट दिसून येत आहे.

आज राज्यात एकाही ओमायक्रॉनबाधितांची नोंद नाही आतापर्यंत 1860 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात  झाली आहे. त्यापैकी 1001 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.32 टक्के आहे.  सध्या राज्यात 23 लाख 44 हजार 919 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 2960 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 72 लाख 82 हजार 128   प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.

मुंबईत 6 हजार 149 नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत तर सात जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 5 हजार 556 नवे कोरोना बाधित आढळले होते मात्र आज थोडीशी वाढ झाली आहे.

Web Title: Maharashtra Corona update Today 38k

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here