Home महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले

राज्यात लॉकडाऊन लागणार का? आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले

Maharashtra Lockdown decision Corona

मुंबई | Lockdown:  राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का?  असा प्रश्न विचारला जात आहे. आता या प्रश्नावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी खुलासा केला आहे.

लॉकडाऊनचा परिणाम थेट अर्थकारणावर होतो. गरीब माणूस हा हातावर पोट भरतो. त्याच्यावर लॉकडाऊनचा थेट परिणाम होतोे. लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनची झळ सोसलेली आहे.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे टास्क फोर्स सोबत बैठक झाली. पंतप्रधानांनीदेखील जान हैं तो जहान है, असं सांगितलं आहे,’ असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

राजेश टोपे यांनी यावेळी लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. लॉकडाऊनचा अजिबात विचार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आरोग्य विभाग टास्क फोर्स सोबत झालेल्या बैठकीत कुठेही लॉकडाऊनची चर्चा नाही. मात्र निर्बंध वाढविले जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

दरम्यान, रा जेश टोपे यांनी यावेळी निर्बंध लावण्यात येणार असल्याची माहितीही दिली आहे. निर्बंधाच्या बाबतीत नक्कीच कठोर कारवाई करण्याच्या अनुषंगाने काम करत आहोत. तरीही कोरोना नियंत्रणात आला नाही तर रेस्टॉरंट, सिनेमाहॉल, मॉल, शाळा-कॉलेजबाबत निर्णय घ्यावा लागेल, असंही टोपे म्हणाले आहेत.

Web Title: Maharashtra Lockdown decision Corona

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here