Home महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून उन्हाळी सुट्या जाहीर

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून उन्हाळी सुट्या जाहीर

Maharashtra Schools holidays

मुंबई | Maharashtra Schools: राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना १ मे पासून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

१ मे ते १३ जून २०२१ दरम्यान शाळेला उन्हाळी सुट्टी देण्यात आली आहे, 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.  शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून अखेर विश्रांती मिळणार आहे  राज्यातील शिक्षक संघटनाकडून वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. विदर्भातील तापमान विचारात घेता विदर्भात 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.

सन २०२०१ या शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनला करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने बऱ्याच ठिकाणी शाळा बंदच ठेवण्यात आल्या होत्या तर ऑनलाईन शिक्षण सुरु होते. पहिली ते अकरावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत  सर्वच विद्यार्थ्यांना पास करून पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: Maharashtra Schools holidays

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here