Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: साठवण टाकीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

अहमदनगर ब्रेकिंग: साठवण टाकीत बुडून सख्ख्या बहिणींचा मृत्यू

Ahmednagar News: घराशेजारील साठवण टाकीत बुडून (drowning) दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू (Death) झाल्याची घटना, पारनेर तालुक्यातील तिखोल येथील घटना.

Many sisters died after drowning in the storage tank

पारनेर | अहमदनगर : घराशेजारील साठवण टाकीत बुडून दोन चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी पारनेर तालुक्यातील तिखोल येथे घडली.

गौरी गुलाब ठाणगे (वय ४), परी गुलाब ठाणगे (वय ३, दोघीही रा. तिखोल, ता. पारनेर) अशी मृत दोघींची नावे आहेत.

गुलाब भास्कर ठाणगे हे तिखोल येथे टाकळी ढोकेश्वरकडे जाणारा रस्ता जवळ राहतात. शनिवारी सायंकाळी त्यांच्या दोन मुली गौरी आणि परी या नेहमीप्रमाणे घराच्या जवळ खेळत होत्या. त्या दोघीही जवळील साठवण टाकीत पडल्या. सायंकाळी कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध सुरू केली. नंतर त्यांचा पाण्याचा साठवण टाकीत पडून मृत्यू झाल्याचे लक्षात आले.

Web Title: Many sisters died after drowning in the storage tank

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here