मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट पासून मराठा क्रांती मोर्चा व्यापक जनआंदोलन
मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट पासून मराठा क्रांती मोर्चा व्यापक जनआंदोलन
मराठा आरक्षणासाठी ९ ऑगस्ट २०१८ पासून राज्यातील मराठा क्रांती मोर्चा व्यापक जनआंदोलन हाती घेण्यात येणार आहे. या आंदोलनात महिला, मुलेबाळे, गुराढोरांसह प्रत्येक गाव, शहर सहभागी होणार आहेत. शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, खासगी आस्थापनाही बंद केल्या जातील.
जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे. एक, दोन दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यातील खासदार, आमदार, मंत्र्याच्या घरांसमोर ठिय्या देण्याचे सूतोवाच राज्याच्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने पत्रकार परिषदेत केले आहे.
You May Also Like:Shahid Kapoor wife age | Mira Rajput
या परिषदेस २२ जिल्ह्यांतील समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. रविवारी दि. २९ जुलै रोजी राज्याच्या समन्वय समितीची राहिचंद्र मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली . बैठकीत ९ ठराव घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर पहिला मोर्चा २०१६ मध्ये औरंगाबादेत काढण्यात आला होता. मोर्चे शांततेत निघाल्याने मुख्यमंत्र्यानी एकही मागणी पूर्ण केली नाही.
आमच्या संगमनेर अकोले न्यूजच्या व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. रहा अपडेट दररोज. धन्यवाद. संगमनेर अकोले न्यूज–येथे क्लिक करा.
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा. आपल्याला ही बातमी आवडल्यास फेसबुक वर जरूर शेअर करा धन्यवाद.