Home संगमनेर काल आरक्षणाला पाठिंबा,  इंदुरीकर महाराज आज थेट मैदानात – Maratha Reservation

काल आरक्षणाला पाठिंबा,  इंदुरीकर महाराज आज थेट मैदानात – Maratha Reservation

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी इंदुरीकर महाराज मैदानात सक्रीय, पाच दिवस कार्यक्रम बंद.

Maratha Reservation Support for reservation yesterday, Indurikar Maharaj today 

संगमनेर: मराठा आरक्षणासाठी राज्यभरातील विविध घटकांसोबत इंदुरीकर महाराजांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. मराठा आरक्षणासाठी सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस कोणताही कीर्तनाचा कार्यक्रम करणार नाही असं त्यांनी आधीच जाहीर केलं आहे. आता ते आंदोलनातही सक्रिय झाले असून संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी भेट दिली. त्यामुळे आधी आंदोलनाला पाठिंबा आणि आज थेट आरक्षणासाठी मैदानात सक्रिय असं काहीसं चित्र इंदुरीकर महाराजांच्या बाबत दिसत आहे.

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी आज सकल मराठा समाजाच्या आंदोलनात सक्रिय उपस्थिती लावली. संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथे सुरू असलेल्या उपोषणस्थळी इंदुरकरांनी भेट दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी जोर्वे गावात आज कडकडीत बंद पाळत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. त्या आंदोलनाला इंदुरीकर महाराजांनी पाठिंबा दिला आहे.

इंदुरीकर महाराजांचे रोजचे नियोजित कार्यक्रम ठरलेले असतात. पण जालन्यामध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी त्याला पाठिंबा देत 5 दिवस कीर्तनाचे कार्यक्रम न करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: Maratha Reservation Support for reservation yesterday, Indurikar Maharaj today 

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here