Home अहमदनगर एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या पतीला मेसेज करून युवतीचे लग्न मोडले

एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या पतीला मेसेज करून युवतीचे लग्न मोडले

Breaking News | Ahmednagar:  होणाऱ्या पतीला मेसेज करून युवतीचे लग्न मोडल्याची घटना समोर पीडितेच्या फिर्यादीवरून तरुणाविरुध्द गुन्हा.

marriage was broken by sending a message to her husband who was having a one-sided love affair

अहमदनगर: होणाऱ्या पतीला मेसेज करून युवतीचे लग्न मोडल्याची घटना समोर आली आहे. नगर शहरात राहणाऱ्या पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी (दि. २८) तोफखाना पोलीस ठाण्यात तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीपक गणेश चौरे (रा. शेंडी पोखर्डी, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. फिर्यादी युवती फेब्रुवारी २०२३ पासून एका सरकारी रुग्णालयात नोकरी करत असताना त्यांची दीपक सोबत ओळख झाली होती. त्यांच्यात मैत्री झाल्याने ते एकमेकांशी बोलत होते, सोबत फोटोही काढले होते. दरम्यान युवतीचा सोनई (ता. नेवासा) येथील तरुणाशी विवाह जमल्याने तिने दीपक सोबत बोलणे बंद केले होते. तरीही दीपक युवतीला, ‘प्रेम आहे, लग्न कर’ म्हणून जवळीक साधत होता. त्याने युवतीच्या होणाऱ्या पतीला, ‘तू कशाला आमच्या मध्ये पडतो, तू तिच्याशी लग्न करू नकोस’, असे मेसेज करून लग्न मोडले. तसेच युवती शनिवारी (दि. २७) दिल्लीगेट परिसरातून जात असताना दीपक याने तिचा हात पकडून गैरवर्तन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

पीडित युवतीने रविवारी तोफखाना पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी दीपक चौरे विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहेत.

Web Title: marriage was broken by sending a message to her husband who was having a one-sided love affair

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here