Sangamner Suicide News: संगमनेर तालुक्यातील खांबे शिवारातील निहारवाडी येथे एका विवाहितीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना. (Ahmednagar News)
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील खांबे शिवारातील निहारवाडी येथे एका विवाहितीने सासरच्या छळाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. काजल मच्छिद्र वाघ (वय २५) असे मयत विवाहित महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात पती व सासू विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत काजल वाघ हिचा १३ मार्च २०१८ रोजी खांबे येथील मच्छिद्र बाळासाहेब वाघ यांच्याशी विवाह झाला होता. सुरवातीचे पाच ते सहा महिने त्याचा संसार सुरळीत चालला. परंतू यानंतर वारंवार पती मच्छिद्र बाळासाहेब वाघ व सासू कुसुम बाळासाहेब वाघ हे किरकोळ कारणावरुन व माहेराहून वेळोवेळी पैसे आणावे, यासाठी मयत काजलला शिविगाळ करणे, टोचून बोलणे व मारहाण करत शारीरिक व माणसिक छळ करत होते. त्यामुळे मुलीचे वडील हे कधी १० हजार रुपये तर कधी २० हजार रुपये देत होते. मात्र, मुलीचा त्रास काही कमी होत नव्हता. त्यामुळे अनेकदा नातेवाईकांनी एकत्रित बैठका घेत समाजावून सांगितले होते. दरम्यान, शनिवार (दि. २१) रात्री पावणे आकरा वाजेच्या सुमारास मयत काजल हिने पती मच्छिद्र यांच्या मोबाईलवरुन वडीलांना फोन करुन मारहाण झाल्याची माहिती देत मला येथून घेऊन जा, असे सांगितले होते. परंतू रात्र झाल्याने उद्या सकाळी येतो असे वडीलांनी काजला त्यावेळी सांगितले. रविवारी (दि. २२) सकाळी मुलीकडे जाण्यासाठी निघालेल्या वडीलांना जावई मच्छिद्र याने सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास फोन करुन काजलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यामुळे ते ही माहिती नातेवाईकांना देत घटनास्थळी दाखल झाले. याचवेळी आश्वी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मयत काजल हिच्या मृतदेहाचा पंचनामा करत पुढील तपासणीसाठी काजलाचा मृतदेह लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात पाठविला होता.
Business Idea | शेतीसंबंधित हा व्यवसाय सुरु करून दर दिवस हजारोंची कमाई करण्याची संधी
दरम्यान, मयत विवाहितेचे वडील बाळासाहेब दामोधर गरगडे यांनी याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी पती मच्छिद्र बाळासाहेब वाघ, सासू कुसुम बाळासाहेब वाघ यांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर १९ / २०२३, भारतीय दंड संहिता कलम ३०६, ४९८अ, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक आव्हाड हे पुढील तपास करीत आहे.
Web Title: married woman committed suicide by hanging herself after being harassed
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App