Home उस्मानाबाद Murder: विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या

Murder: विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या

Murder Case: बंदुकीची एक गोळी छातीवर लागल्याने ती गंभीर जखमी, उपचार सुरू करताच ८ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

Married woman shot firing dead

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथील एका वीस वर्षीय विवाहित तरुणीची गोळी झाडून हत्या झाल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

कार्ला येथील काजल मनोज शिंदे (२०) हिचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. मात्र, सध्या ती पतीसह कार्ला येथील आपल्या आई वडिलांकडे वास्तव्यास होती. दरम्यान, रविवारी सायंकाळी तिच्यावर गोळीबार करण्यात आला. बंदुकीची एक गोळी छातीवर लागल्याने ती गंभीर जखमी झाली. या अवस्थेतच तिला कुटुंबीयांनी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने काजलवर प्रथमोपचार करून तातडीने पुढील उपचारासाठी उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे तिच्यावर उपचार सुरू करताच ८ वाजेच्या सुमारास तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, ही घटना नळदुर्ग ठाण्याच्या हद्दीत झाली असल्याने रात्री माहिती कळल्यानंतर १० वाजेच्या सुमारास पोलीस घटनास्थळी रवाना झाले. मयत तरुणीवर कोणी व का गोळी झाडली, हे नेमके आत्ताच सांगता येणार नसल्याचे नळदुर्ग पोलिसांनी सांगितले.

कार्ला येथील २० वर्षीय तरुणीला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात रविवारी रात्री दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Married woman shot firing dead

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here