इंस्टाग्रामवर सुत जुळलं, प्रेमातून गर्भधारणा, नंतर जे घडलं ते धक्कादायक…
Nagpur Crime: अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमातून (Love) गर्भधारणा, मुलीने युट्यूबच्या माध्यमातून घरात प्रसुती केल्याची धक्कादायक घटना.
नागपूर: अल्पवयीन मुलीची इंस्टाग्रामवर झालेल्या प्रेमातून गर्भधारणा झाली. त्याची मुलीच्या घरात कुणालाच कल्पना नव्हती. मुलीने युट्यूबच्या माध्यमातून घरात प्रसुती केली. या सगळ्यामध्ये नवजात मुलाचा मृत्यू झाला आहे. मुलीच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी त्या तरुणाचा सोशल मीडियाच्या अकाऊंटवरुन शोध घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नववी वर्गात शिकणाऱ्या पंधरा वर्षीय मुलीची वर्षभरापूर्वी इंस्टाग्रामवरून एका तरुणाशी सुत जुडलं. त्यानंतर त्या तरुणाने त्याचा फायदा घेत तिच्यावर अतिप्रसंग केला. यातून तिला गर्भधारणा झाली, घरात कोणाला कळू नये म्हणून त्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलींन स्वतः च घरात प्रसूती करत बाळाला जन्म दिला. मात्र संध्याकाळी मुलीची आई घरी आल्यावर प्रकृती खराब असल्यानं तिला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर पीडित मुलीने आईला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यावरून पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून इंन्स्टाग्राम आयडीवरून मिळलेल्या नावाच्या आयडीवरुन तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंबाझरी पोलीस करत आहे. मुलीने युट्यूब बघून प्रसूती केली असल्याची चर्चा होत आहे. मात्र पोलिसांनी या संदर्भात माहिती नसल्याचं सांगितलं आहे. यामध्ये मुलीने युट्यूबवरून की अन्य कशावरून माहिती घेत प्रसूती केल्याबाबत अद्याप स्पष्ट झालेलं नसल्याचं पोलिसांनी सांगितले. पोलीस आरोपी तरुणाचा शोध घेत आहे.
Web Title: Matched on Instagram, conceived through love, what happened next is shocking
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App