Home Suicide News विवाहित चिमुकलीसह मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

विवाहित चिमुकलीसह मायलेकीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

 

Miley's suicide by jumping into a well

टाकळीमिया: विवाहितेने आपल्या चिमुकलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना टाकळीमियात घडली आहे. या मायलेकींच्या आत्महत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विद्या दिलीप कडु (वय 25) व सिध्दी दिलीप कडु (वय 4) असे आत्महत्या केलेल्या दोघींचे नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, टाकळीमिया येथील बापूसाहेब शिंदे रिक्षाचालक यांची मुलगी विद्या हिचा विवाह देवळाली प्रवरा येथील दिलीप कडू यांच्याशी ५ वर्षापूर्वी झाला होता. त्यांना चार वर्षाची मुलगी होती. विद्या ही शाळेत असल्यापासून थोडी मनोरुग्ण होती. तिला औषधोपचार सुरु होता. या आजारामुळे गेली ३ वर्षापासून टाकळीमिया येथे माहेरी राहत तिची होती. श्रीरामपूर येथे उपचार सुरु होते. बुधवारी १ तारखेला तिला श्रीरामपूर येथील दवाखान्यात नेण्याचे ठरले होते.

तिचे वडील हे रिक्षाला डिझेल टाकण्यासाठी गावात गेले होते व तिची आई त्यांच्यासाठी डबा बनवत होती. मात्र विद्या ही या औषधोपचार व इंजेक्शनला पूर्णपणे वैतागली होती. तिने संधी साधून आपल्या लहान चिमुकलीला घेऊन जवळच असलेल्या विहीरीत उडी टाकली. त्यानंतर तिचा सर्वत्र शोध सुरू झाला सोशल मीडियावर फोटो व्हायरल केला. मात्र तिचा शोध लागला नाही. त्यामुळे बुधवारी रात्री देवळाली प्रवरा पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल केली. तरीही सर्वत्र शोध सुरू होता. गुरुवारी सायंकाळी विहीरीत चिमुकल्या सिध्दीचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नंतर विहिरीतील पाणी उपसून आईचा मृतदेहदेखील हाती लागला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

Web Title: Miley’s suicide by jumping into a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here