Home Accident News संगमनेर: लष्करी जवानाचा अपघातात मृत्यू

संगमनेर: लष्करी जवानाचा अपघातात मृत्यू

Military death in an accident at sangamner

संगमनेर | Accident: कोल्हार संगमनेर रोडवर कोंची शिवारात स्कॉर्पियो व पिकप अपघातात लष्करी जवानाचा मृत्यू तर तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. गुरवारी रात्री रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

शक्तीभान अरुण रोकडे वय  असे मृत्यू जवानाचे नाव आहे. मनाली अरुण रोकडे व दोन मुले जखमी झाले.

नाशिक येथील आर.टी. सेंटर येथे हवालदार असलेले शक्तीभान रोकडे सुट्टीसाठी अहमदनगरकडे गुरुवारी जात असताना रात्री आठ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कोंची शिवारात लोणीहून संगमनेरकडे भरधाव वेगाने जात असलेल्या माल वाहतूक पिक अप णे जोरदार धडक दिली. या अपघातात शक्तीभान अरुण रोकडे, मनाली अरुण रोकडे व दोन मुले गंभीर जखमी झाले. त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना शक्तीभान रोकडे यांचा मृत्यू झाला. याबाबत मानली रोकडे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तात्याराव वाघमारे हे करीत आहे.

Web Title: Military Man death in an accident at sangamner

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here