Home अहमदनगर मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी राजीनामे  द्यावे: आ.विखे पाटील

मराठा आरक्षण: मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांनी राजीनामे  द्यावे: आ.विखे पाटील

Ministers should resign along with the Chief Minister radhakrishna vikhe patil

शिर्डी | Radhakrishna Vikhe Patil: मराठा समाजाच्या जीवावर राजकारण करणारेच आता सत्तेत राहून फसवणूक करीत आगे. समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यात महाविकास  आघाडीला अपयश आले आहे. समाजाची उपेक्षा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील मराठा समाजाच्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

खासदार संभाजी राजेंच्या उपोषणाला आपला पाठींबा असून सोमवारी आपण मुंबईमध्ये त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आ. विखे पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, आरक्षणाच्या प्रश्नात मराठा समाजासह ओबीसी धनगर समाजाची फसवणूक महाविकास आघाडी सरकारने केली आहे. या सरकारवर कोणत्याही समाज घटकांचा विश्वास राहिला नाही. सरकारने केलेली फसवणूक आणि आरक्षण संदर्भात असलेल्या निष्क्रियतेबद्दल सर्वच समाजामध्ये अस्थ्वास्था आहे.

Web Title: Ministers should resign along with the Chief Minister radhakrishna vikhe patil

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here