Home अहमदनगर अहमदनगर: अल्पवयीन मुलगी आजीकडे जाते सांगून गेली ते बेपत्ता

अहमदनगर: अल्पवयीन मुलगी आजीकडे जाते सांगून गेली ते बेपत्ता

Breaking News | Ahmednagar: आजीकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात तरुणाने अपहरण.

minor girl goes to her grandmother and says she is missing

राहुरी: आजीकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीचे अज्ञात तरुणाने अपहरण केले. ही घटना राहुरी तालुक्यात दि.२५ फेब्रुवारी रोजी घडली.

या घटनेतील अल्पवयीन मुलीची आई कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी मुलगी घरात एकटीच होती. आई संध्याकाळी घरी आल्यानंतर मुलगी घरातून बेपत्ता झाल्याचे दिसले. तिचा परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. मुलीच्या आईने शेजारच्या लोकांना चौकशी केली असता ती मुलगी आजीकडे जाते, असे शेजारच्या बाईला सांगून दुपारी दोन वाजता घरातून बाहेर गेली अशी माहिती मिळाली. मात्र आपल्या मुलीचे कोणीतरी अज्ञात तरुणाने अपहरण करून पळवून नेले अशी खात्री झाल्यानंतर राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: minor girl goes to her grandmother and says she is missing

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here