Home औरंगाबाद अल्पवयीन मुलगी गर्भवती, अत्याचार कोणी केला आठवत नाही

अल्पवयीन मुलगी गर्भवती, अत्याचार कोणी केला आठवत नाही

Breaking News | Crime: तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार.

minor girl is pregnant, she does not remember who abused her

छत्रपती संभाजीनगर: तेरा वर्षांच्या शाळकरी मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार मुकुंदवाडी परिसरात घडला. मात्र, अत्याचार कोणी केला याबाबत पीडितेने काहीच माहीत नसल्याचे सांगितल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला. पालकांकडून तक्रारीत विलंब झाल्याने अखेर मुकुंदवाडी पोलिसांनीच फिर्यादी होत सोमवारी रात्री याप्रकरणी अज्ञात आरोपीवर बलात्कार, बाललैंगिक अत्याचार कलमांअंतर्गत गुन्हा दाखल केला.

१३ वर्षीय करिष्मा (नाव बदलले आहे) मुकुंदवाडी भागात आई- वडिलांसह राहते. वडील रिक्षाचालक असून, आई खासगी रुग्णालयात नोकरी करते. काही दिवसांपासून मुलीच्या प्रकृतीत आईला बदल जाणवायला लागला. आईने तिला एका खासगी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी सोनोग्राफी करण्यास सांगितले.

शंकेची पाल चुकचुकल्याने आईने तिला सूतगिरणी चौकातील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर करिष्मा गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. हे ऐकून आईला धक्काच बसला.

 अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्याने डॉक्टरांकडून याबाबत पोलिसांना माहिती मिळाली. आई-वडिलांची विचारपूस सुरु झाली.  मात्र, कोणीही काहीही सांगण्यास तयार नव्हते. मुलीने तिच्यावर अत्याचार कोणी केला, याबाबत काहीच आठवत नसल्याचे सांगितले.

Web Title: minor girl is pregnant, she does not remember who abused her

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here