Home महाराष्ट्र धक्कादायक: प्रेमप्रकरणामुळं जन्मदात्या माता-पित्यानेच केली अल्पवयीन मुलीची हत्या

धक्कादायक: प्रेमप्रकरणामुळं जन्मदात्या माता-पित्यानेच केली अल्पवयीन मुलीची हत्या

minor girl was murder by her birth parents due to a love affair

कराड | Karad : सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये  काळजाचा ठोका चुकवणारी घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणामुळं जन्मदात्या माता-पित्यानेच अल्पवयीन मुलीचा खून (murder) केल्याची खळबळजनक धक्कादायक घटना घडली आहे.  कराडच्या येणके येथे हा खळबळजनक प्रकार पोलिसांच्या तपासातून समोर आला आहे.  मयत पावलेल्या मुलीचा मृतदेह पवारवाडी येथील डोंगरावर १४ दिवसांपूर्वी जमिनीत पुरला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अल्पवयीन मुलीचा आई-वडिलांनीच खून केल्याची धक्कादायक घटना कराड तालुक्यातील येणे येथे उघडकीस आली आहे. कराड तालुक्यातील येणके गावातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी 17 एप्रिल रोजी कराड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दिपज्योती पाटील यांच्याकडे होता. शनिवारी रात्री फिर्यादी वडिलांकडे पोलिसांनी कसून चौकशी केली. त्यानंतर संबंधीत गुन्ह्या आपणच केल्याची कबुली मुलीच्या वडिलांनी दिली. ‘माझ्या अल्पवयीन मुलीचे प्रेमप्रकरण होते. त्यामुळे मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीचा खून केला.’ अशी माहिती आरोपीने पोलीस तपासात दिली.

Web Title: minor girl was murder by her birth parents due to a love affair

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here