Home क्राईम पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, रक्षकच  बनला भक्षक

पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, रक्षकच  बनला भक्षक

Crime News: केवळ अत्याचारच (Sexual abused) नव्हे, तर धाक दाखवून पीडितेकडून सात लाख रुपयांची खंडणीही उकळली.

a minor girl was sexually abused by the police

सांगली : शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. केवळ अत्याचारच नव्हे, तर धाक दाखवून पीडितेकडून सात लाख रुपयांची खंडणीही उकळण्यात आली. स्वप्निल विश्वास कोळी ( रा. शिरोळ, जि. कोल्हापूर ) असे संशयित पोलिसाचे नाव आहे. कोळी कार्यरत असलेल्या विश्रामबाग पोलिस ठाण्यातच त्याच्यावर अत्याचार, खंडणी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

अल्पवयीन पीडिता ही शहरातील एका उपनगरात राहण्यास आहे. जानेवारी २०२२ दरम्यान स्वरूप चित्रमंदिरानजीक एका वस्तीत एका महिलेकडे पीडिता राहण्यास होती. त्यावेळी संशयित कोळी याने पीडितेच्या घरात घुसत पीडितेचा विरोध धुडकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा त्याने अत्याचार केले. अत्याचार केल्यानंतर कोळी याने पीडितेकडून दोन लाख, तर पुन्हा वस्तीवर पोलिसांचा छापा पडणार होता, त्याची अगोदर माहिती दिल्याबद्दल पाच लाखांची मागणी करत पैसे घेतले होते.

पोलिसाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार व खंडणी वसुलीचा प्रकार समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करीत कारवाईला सुरुवात केल्याचे समजते.

Web Title: a minor girl was sexually abused by the police

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here