Home अहमदनगर अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपलेली असताना चौघांनी आळीपाळीने केला अत्याचार

अल्पवयीन मुलगी घरात एकटी झोपलेली असताना चौघांनी आळीपाळीने केला अत्याचार

minor girl was sleeping alone in the house, the four of them took turns sexual abusing

Ahmednagar Crime | अहमदनगर: अल्पवयीन मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत चौघांनी तिच्यावर अत्याचार (sexual abusing) केल्याची घटना अहमदनगर शहरात घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात सिल्वर चव्हाण, वरगा सिल्वर चव्हाण, सुनील सिल्वर चव्हाण, अनिल सिल्वर चव्हाण यांच्याविरूध्द अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दाखल केली आहे. पीडिता तिच्या आई-वडील आणि भावासह अहमदनगर शहरात वास्तव्यास आहे. पिडीतेचा भाऊ आणि अनिल चव्हाण यांचे दारू पिण्यावरून वादविवाद झाले होते. त्यावरून अनिल चव्हाण याने पिडीतेच्या आईला दगडाने मारहाण केली होती. पिडीतेची आई मारहाणीत गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शहरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

पीडिता रविवारी शेळ्या चारून दुपारी घरी आली. त्यानंतर तिने जेवण तयार करून तिच्या आईला डब्बा रूग्णालयात पोहोच केला. त्यानंतर पीडितेच्या वडिलांनी तिला दुचाकीवरून घरी सोडले. रात्रीच्यावेळी पिडीता घरात एकटी झोपलेली असताना सिल्वर चव्हाण, वरगा चव्हाण, सुनील चव्हाण आणि अनिल चव्हाण हे चौघेही पिडीतेच्या घरी आले. त्यानंतर आरोपी सिल्वर चव्हाण आणि त्याची बायको वरगा चव्हाण यांनी पिडीतेचे हात धरले असता सुनील आणि अनिल चव्हाण यांनी पीडितेवर आळीपाळीने अत्याचार केला असे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: minor girl was sleeping alone in the house, the four of them took turns sexual abusing

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here