Home क्राईम अल्पवयीन मुलीस थेट सुरतला नेत अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी

अल्पवयीन मुलीस थेट सुरतला नेत अत्याचार, आरोपीला पोलीस कोठडी

Jalgaon Crime News: अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेत थेट सुरत गाठले. या ठिकाणी तिच्यावर अत्याचार (abused) केल्याचे समोर. 

minor girl was taken directly to Surat and abused

जळगाव: राज्यात अल्पवयीन मुलीना पळून नेऊन अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असतानाच आता अल्पवयीन मुलीला अज्ञाताने पळवून नेत थेट सुरत गाठले. या ठिकाणी तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले आहे.  या प्रकरणी बेटावद (ता. जामनेर) येथील समाधान लक्ष्मण सुरासे (वय २३) याला जिल्हा न्यायालयाने ८ डिसेंबरपर्यंत पोलिस  कोठडी सुनावली आहे.

जामनेर तालुक्यातील एका खेड्यातील अल्पवयीन बालिकेला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अपह्रत बालिकेस समाधान लक्ष्मण सुरासे हा घेवुन गेल्याची माहिती पेालिसांना मिळाली. पथकाने सुरत गाठून ४ डिसेंबरला पिडितेला सुरत येथून परत आणले. पिडीत मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्या सेाबत अनैतिक कृत्य झाल्याचे आढळून आले. मुलीला विश्वासात घेवुन चौकशी केल्यावर मुलीने जबाब दिला. 

मुलीच्या जबाबानुसार संशयीत समाधान याने शरीरसंबध केल्याचे सांगितले. पिडीतेचा जबाब वैद्यकीय अहवालानुसार अपहरणाच्या गुन्ह्यासोबत बाल लैंगिक अत्याचाराच्या कलमांचा समावेश करण्यात आला. अटकेतील संशयीताला मंगळवार( ता.५) जळगाव जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. एस. वावरे संशयीताला तीन दिवस  पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले.

Web Title: minor girl was taken directly to Surat and abused

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here