Home अहमदनगर अहमदनगर: बाजार समितीच्या कांदा अनुदानात गैरव्यवहार, १६ जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर: बाजार समितीच्या कांदा अनुदानात गैरव्यवहार, १६ जणांवर गुन्हा दाखल

Breaking News | Ahmednagar: श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३०२ शेतकऱ्यांच्या नावे १ कोटी ८८ लाख ४७ हजार रुपयांचा कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करत त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक.

Misappropriation in market committee's onion subsidy

श्रीगोंदा : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ३०२ शेतकऱ्यांच्या नावे १ कोटी ८८ लाख ४७ हजार रुपयांचा कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करत त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांच्या तक्रारीवरून चौकशी होत बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह आडते व व्यापारी, अशा १६ जणांवर राजेंद्र फकिरा निकम जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग १ सहकारी संस्था, अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सन २०२२-२३ या कालावधीत श्रीगोंदा बाजार समितीमध्ये प्रशासक राज होते. त्यावेळी या समितीचा कारभार प्रशासक म्हणून दिलीप डेबरे हे पाहत होते. या कालावधीत कांदा अनुदानाबाबत सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस यांनी तक्रार केल्याने कांदा अनुदानाची चौकशी होऊन चौकशी अहवालामध्ये यातील ४९५ पैकी ३०२ कांदा अनुदान प्रस्ताव अपात्र व बोगस असल्याचे आढळून येत १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचे बोगस प्रस्ताव करून कांदा अनुदान लाटण्यात आले असल्याचा अहवाल दिला. याप्रकरणी चौकशी अहवालात दोषी असलेले बाजार समितीचे सचिव दिलीप डेबरे यांच्यासह आडते/व्यापारी हवालदार ट्रेडिंग कंपनी आणि त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्स, घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रेय किसन राऊत (रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा.श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा. श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिबिरे (रा. साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी कडवळीत), यांचा समावेश आहे. यात एकूण ३०२ शेतकऱ्यांच्या नावावर ५३ हजार ८५० क्विंटल कांद्याची बोगस आवक दाखवत १ कोटी ८८ लाख ४७ हजार ५२४ रुपयांचा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर निकम करीत आहेत.

Web Title: Misappropriation in market committee’s onion subsidy

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here