Monsoon 2022: मान्सून ३० मे पर्यंत केरळमध्ये होणार दाखल
Monsoon 2022: अंदमानात थंडावलेला मान्सून येत्या दोन तीन दिवसांत केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्याची परिस्थिती अशीच अनुकूल राहिल्यास मान्सून ३० मे पर्यंत केरळमध्ये दाखल होईल अशी शक्यता आहे. त्यानंतर देशात प्रवास करणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण अरबी समुद्राच्या खालच्या स्तरात पश्चिम वारे सशक्त झाले आहेत. तसेच हे वारे खोलवर पोहोचले आहेत. केरळच्या किनारपट्टीवर तसेच दक्षिण अरबी समुद्रावर ढगांची दाटी वाढली आहे. त्यामुळे येत्या ४८ ते ७२ तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे.
Web Title: Monsoon 2022 will arrive in Kerala by May 30