Home Accident News मॉर्निंग वॉक बेतले जीवावर, वाहनाच्या धडकेत दोघे ठार

मॉर्निंग वॉक बेतले जीवावर, वाहनाच्या धडकेत दोघे ठार

Accident News: फिरायला गेलेल्या दोघांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना.

Morning walk takes a toll, two killed in car collision Accident

भादोले | कोल्हापूर: पहाटेच्या वेळी फिरायला गेलेल्या दोघांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. शालन बाळू वडार (वय ७०, रा. कुरळप, ता. वाळवा) व दिलीप विठ्ठल पाटील (५८, रा. भादोले) अशी त्यांची नावे आहेत. हा अपघात पहाटे सहाच्या सुमारास भादोलेनजीक मसोबा फाट्याजवळ झाला.

आष्ट्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव वाहनाने प्रथम शालन वडार यांना पाठीमागून जोराची धडक दिली व पुढे २० मीटरवर असलेल्या दिलीप पाटील यांनाही जोराची धडक दिली. डोक्याला गंभीर इजा होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

कॉपी पकडल्याने मुलीने संपविले आयुष्य (Suicide)

मुंबई: परीक्षेदरम्यान कॉपी करताना पकडल्याने स्नेहल पवार या नववीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आयुष्य संपविल्याची घटना चेंबूरमध्ये घडली.

स्नेहल पवार ही चेंबूर कॅम्प परिसरात राहणारी व नववी इयत्तेत शिक्षण घेत होती. मंगळवारी तिचा पेपर सुरू असताना ती कॉपी करत असल्याचे शिक्षकाने पाहिले. तिची कॉपी ताब्यात घेत याबाबत तिच्या आईलाही सांगितले. त्यामुळे आई ओरडली. याच तणावातून तिने दुपारच्या सुमारास घरात कोणीही नसताना, गळफास घेत आत्महत्या केली. चेंबूर पोलिसात अपमृत्यूची नोंद झाली आहे.

Web Title: Morning walk takes a toll, two killed in car collision Accident

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here