Home क्राईम दोन मुलांची माय एका मुलीच्या बापासोबत भुर्रर्र…ऊसतोडणीसाठी सोबत असताना

दोन मुलांची माय एका मुलीच्या बापासोबत भुर्रर्र…ऊसतोडणीसाठी सोबत असताना

Beed Crime: ऊसतोडणीला सोबत असल्याने जुळले प्रेम, दोन मुलांची आई असलेल्या महिलेने एका मुलीचा बाप असलेल्या कामगारासोबत धूम ठोकली.

Mother of two sons with father of one daughter Crime Filed

बीड : प्रेमाला वयाचे बंधन नसते, पण प्रेमासाठी सामाजिक भानही सुटत चालले आहे. दोन मुलांची आई असलेल्या महिलेने एका मुलीचा बाप असलेल्या कामगारासोबत धूम ठोकली. फिर्यादीवरून महिलेच्या पतीच्या पळवून व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हे दोघेही ऊसतोडणीसाठी सोबत असताना त्यांची मने जुळली होती, असे सांगण्यात आले.

सीमा व योगेश (दोघांचेही नाव बदललेले) हे दोघेही ऊसतोड कामगार आहेत. सीमा पतीसोबत, तर योगेश हा आपल्या कुटुंबासमवेत पंढरपूर येथे ऊसतोडणीसाठी गेला होता. सीमाला दोन मुले असून, योगेशलाही एक मुलगी आहे. दोघेही एकाच टोळीत असल्याने, दोघांच्याही कोप्या (घरे) शेजारीच होते. त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीतून प्रेम जुळले. काम संपल्याने हे सर्व महिन्यापूर्वी गावी आले. २४ मार्च रोजी महिलेचा पती ट्रॅक्टर घेऊन नांगरणीसाठी गेला असता, दुपारनंतर ती गायब झाली. पतीने आधी घरी व नंतर सासऱ्यासह इतर नातेवाइकांकडे विचारपूस केली, परंतु ती दिसली नाही. अखेर पत्नीनेच तिच्या वडिलांना फोन करून पळून गेल्याचे सांगितल्याने, पतीने अंमळनेर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली.

दरम्यान योगेशची बायकोही काही दिवसांपूर्वी मुलीला सोडून गावातीलच व्यक्तीसोबत पळून गेल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिस याचीही माहिती घेत आहेत. दरम्यान, सध्या योगेशची मुलगी त्याच्या आई-वडिलांकडे, तर सीमाची दोन्ही मुले तिच्या पतीकडे असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Mother of two sons with father of one daughter Crime Filed

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here