Home क्राईम धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून चाकूने तरुणीचा गळा चिरून हत्या

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून चाकूने तरुणीचा गळा चिरून हत्या

Wardha Crime: तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या (Murder) केल्याची घटना.

Murder a young woman by slitting her throat with a knife due to one-sided love

वर्धा: एकतर्फी प्रेमातून प्रेमातून धक्कादायक घटना समोर आली आहे.  वर्धा  जिल्ह्यातील सेलू तालुक्यात एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या करण्यात आली. दहेगाव गोसावी गावातील 23 वर्षीय तरुणीची सोमवारी (2 ऑक्टोबर) रात्री हत्या करण्यात आली. प्रियकराने तरुणीला घराबाहेर बोलावलं आणि अंगणातच चाकूने तिचा गळा चिरून तिची हत्या केली, त्यामुळे गावात खळबळ निर्माण झाली आहे. हत्येनंतर गावात तणावाचे वातावरण बनले होते.

संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या गाड्यांची जाळपोळ केली आहे. वर्ध्याचे खासदार रामदास तडस आणि हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांनी मंगळवारी (3 ऑक्टोबर) गावात सांत्वन भेट दिली. दुर्दैवी घटनेत हत्या झालेल्या तरुणीच्या आईवडिलांची त्यांनी भेट घेतली.

संबंधित प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी पीडित कुटुंबाने केली असून हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

Web Title: Murder a young woman by slitting her throat with a knife due to one-sided love

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here